परतूर (लक्ष्मीकांतजी राउत)– शहरात तिसरे खाजगी कोव्हीड सेंटर असलेल्या आनंद डेलिकेटेड चे उद्घाटन बुधवार दि 12 मे रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर नवल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी डॉ.प्रमोद आकात, डॉ.योगेश पडोळ, डॉ.रवींद्र बरकुले, डॉ.संदीप चव्हाण,डॉ.मुनीर कादरी, डॉ.शरद पालवे, डॉ.अमोल भगस, डॉ.प्रदीप सातोनकर, डॉ.कुणाल उढाण, डॉ.गजानन केशरखाने, डॉ. घुले ,कल्याण बागल,रमेश डाके, सुंदर कदम ,संजय व्यवहारे, भारत मंडपे,नर्सेस, ब्रदर्स व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
शहरात आनंद हॉस्पिटल हे तिसरे खासगी कोव्हीड रुग्णांलय असून यामुळे कोव्हीड रुग्णांना जालना सारख्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज शक्यतो भासणार नाही, परतूर मध्येच उपचार करणे शक्य होईल .रुग्णालयाचे डॉ.भानुदास कदम यांनी यावेळी माहिती देतांना सांगितले की एकूण 45 बेड पैकी 25 बेड ऑक्सिजन व 20 बेड नॉन ऑक्सिजनचे असून नॉन ऑक्सिजन बेडची सुविधा सौम्य व मध्यम कोरोना संक्रमित रुग्णावर उपचार करण्यासाठी असेल.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप एकनाथ कदम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत वेडेकर यांनी केले.