Live
जालना दर्पण

गुटखा बंदी असुनही आष्टी परिसरात विक्री ‘ओक्के’ मध्येच चालू ; प्रशासन लक्ष देईना!

आष्टी (राजेश्वर नायक):- आष्टी ता परतूर सह परिसरात गुटखा, सुंगधी तंबाखू आदी बंदी असलेल्या पदार्थ राजरोस विक्री होत असताना प्रशासन मात्र लक्ष का देईना असा प्रश्न निर्माण झाला आहे .या विषयी अधिक माहिती अशी की राज्य सरकारने तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असल्याने. व यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली होती खरी मात्र त्याची काटेकोर पणे ‘ओक्के’ मध्ये बंदी झालीच नाही आज सर्वत्र या बंदी असलेल्या गुटख्याची विक्री अगदी राजरोस पने ‘ओक्के’ मध्ये सुरू आहे. अखेर गुटखा माफिया असे राजरोस बंदी असलेला गुटखा विक्री कसे काय करीत आहे अन्न व औषध प्रशासन का या कडे कानाडोळा करीत आहे असा प्रश्न पडत आहे आज घडीला आष्टीत सह परिसरातील ग्रामीण भागात किराणा दुकान असो अथवा पानटपरी राजरोस पने गुटखा विकला जात आहे बंदीमुळे केवळ वर पुड्या न लटकावत खाली ठेवून विक्री केले जाते येवढा मात्र बंदीचा सन्मान राखला जात आहे आज तरुण पिढी या गुटख्याच्या आहारी गेली असल्याने पालक वर्ग चिंतेत आहे तर प्रशासनातील अनेक कर्मचारी अधिकारी देखील या गुटख्याचा मोहाला आवरू शकत नाहीत मग बंदी काटेकोर पने कशी राहणार वर्षभरातून चार दोन कार्यवाही करून प्रशासन दफ्तर वर नोंदी घेत कार्यवाही करीत आहे मात्र कार्यवाही होऊनही परत गुटखा विक्री काही थांबताना दिसत नाही उलट गुटख्याच्या पुड्याची दरवाढ होते मात्र गुटखा मिळतोच गत ३० नोव्हेंबर ला पोलीस प्रशासनास गुप्त बातमीदारा कडून माजलगाव कडून परतूर कडे गुटखा आणला जाणार असल्याच्या माहिती वरून आष्टी येथे ११ लाखाचा गुटखा सापळा लावून जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली मात्र येवढी मोठी कार्यवाही होऊनही गुटखा विक्रीवर काही परिणाम झालाच नाही या घटनेला दोन महिने देखील झाले नाही आजही गुटखा राजरोस पने विकला जात आहे मात्र अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने मात्र या बेधक विक्री करणाऱ्यावर कार्यवाही कधी होणार की ओक्के मध्ये विक्री होतच राहणार हे पाहावे लागणार आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!