Live
कृषी दर्पण

कृषी अधिकाऱ्यांचा अकोली येथील शेतकरी तुकाराम सोळंके यांच्या फळबागेचा पाहणी दौरा

अकोली (प्रतिनिधी )– अकोली येथील शेतकरी तुकाराम सोळंके यांच्या फळबागेचा पाहणी दौरा परतूरचे तालुका कृषिअधिकारी डॉ. एस. एन. पवळ व त्यांच्यासहकाऱ्यानी आज यांनी केला . या वेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते . याप्रसंगी सीताफळ छाटणी कशी करावी याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी दिली . तसेच कागदी लिंबू व आंबा बागेची पण पाहणी केली व या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दौऱ्यात डॉ. एस. एन. पवळ तालुका कृषी अधिकारी परतूर यांच्या सह माने ए. एच. मंडळ कृषि अधिकारी परतूर , एम .के. काटे मंडळ कृषि अधिकारी आष्टी , डी.शी. ढोले कृषि पर्यवेक्षेक, बि.आर. कांबळे कृषि सहाय्यक यांनी सहभाग घेतला . या वेळी तुकाराम सोळंके यांच्या सोबत विक्रमराजे तौर ,एकनाथ खुळे ,सुनील काटे ,उद्धव गुंजाळ ,अर्जुन सोळंके ,शरद देशमुख ,अप्पाराव देशमुख आदी उपस्थित होते .


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!