Live
जालना दर्पण

चार राज्यात भाजपा विजयाचा परतूर मध्ये जल्लोष;जनता भाजपच्या पाठीशी हे सिद्ध – भगवान मोरे

परतूर (लक्ष्मीकांतजी राउत)- पाच पैकी चार राज्यात भाजपने मीळवलेल्या दणदणीत विजयाचा परतूर शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.शहरातील महादेव मंदीर चौकात गुरुवारी दुपारी कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला.
शहरात सकाळपासूनच पाच राज्यांच्या निकालासाठी बहुतेकजण टीव्ही समोर बसलेले होते.पंजाब वगळता उत्तरप्रदेश, उत्तराखंड,मणिपूर व गोवा राज्यात भाजपने मीळवलेला विजय पाहून शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरलेला होता.दुपारी बारा वाजता मोंढा भागातील महादेव मंदीर चौकात भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने गोळा होऊन त्यांनी तेथे फटाक्याची आतषबाजी केली ,यावेळी नरेन्द्र मोदी,योगी आदित्यनाथ ,देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.यावेळी शहरातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी भगवानराव मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते यावेळी बोलतांना म्हणाले की अनेक टिव्ही चॅनल ने सर्व्हे मध्ये भाजपाची उत्तरप्रदेश सोडता इतर राज्यात कडवी लढत होणार आहे असे म्हंटले होते पण मतदारांनी पंजाब सोडला इतर चारही राज्यात भाजपच्या बाजूने कौल देत पंत प्रधान नरेन्द्र मोदी व योगी आदित्यनाथ यांच्या नेतृतत्वावर शिक्कामोर्तब केले आहे.या निकालाने आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित महाराष्ट्रात भाजपा ला कोणी विजयापासून थांबवू शकत नाही हेही अधोरेखित झाल्याचे मोरे यांनी सांगितले.
या जल्लोष सोहळ्यात भगवान मोरे ,ओम मोर, संपत टकले ,छत्रगुन कणसे ,सुधाकर सातोनकर, संदीप बाहेकर ,बालाजी सांगुळे ,प्रवीण सातोंनकर, कृष्णा आरगडे, राजू मुंदडा, श्यामसुंदर चितोडा, संतोष काळे ,सिद्धेश्वर लहाने ,अमोल अग्रवाल, शुभम कठोरे ,नरेश कांबळे ,नरेश सोनवणे, गणेश अंभोरे ,राहुल साठे व इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!