Live
महाराष्ट्र दर्पण

दसरा मेळाव्यांवरून रस्सीखेच

मुंबई (वृत्तसंस्था ): शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे अनेक वर्षा चे नाते असून, दरवर्षी दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थित असतात . यंदा मात्र पाच ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका मेळावा कुणी घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या वर्षी दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडूनही मुंबई महापालिके कडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सध्या दसरा मेळाव्यांवरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय, गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. विचारांचं सोनं लुटून शिवसैनिक पक्षाचं काम जोमानं करायचा पण आता शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि सर्वच काही चित्र बदलून गेलंय. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह कोणाकडे जाईल अद्याप सांगता येत नाही त्यात पक्षाच्या कार्यक्रमात देखील विभागण्या होताना दिसत आहे. हे सगळं सुरु असाताना स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही.
गेली अनेक वर्ष दस-या मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांची भेट व्हायची या दोघाचं नातं अतूट आहे . शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. शिवसेनेची राजकीय भूमिका, पुढील वाटचाल दिशा हि शिवसैनिकांसमोर मांडली जात असे आधी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे अशी पिढ्यांपिढ्या सुरु असलेली ही एक परंपरा आहे . या परंपरेला आता कोण छेद देणार का उद्धव ठाकरे या सर्वांना छेद देत दसरा मेळावा दिमाखात पार पाडणार हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
शिवसेनेची जाणीवपूर्वक अडवणूक?
मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. यामुळे आता अप्रत्यक्षरित्या राज्य सरकार म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकार मुंबई महापालिकेचा कारभार हाकत आहे. आम्हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणी घ्यायचा यावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच शिवसेनेने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने हात आखडता घेतल्याचं कळतं.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!