Live
जालना दर्पण

देवर्षी संगीत विद्यालयाचा देशभक्तांना समर्पित देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम रंगला

परतूर(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रामेश्वर नरवडे संचलित देवर्षि संगीत विद्यालयातर्फे ‘एक शाम शहीदो के नाम’ हा देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम वरद विनायक लॉन्स येथे कार्यक्रम थाटात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामेश्वर नरवडे यांनी केले. त्यानंतर संगीत विद्यालयाचे विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये वैष्णवी वाकडे हिने देश रंगीला रंगीला दिल दिया है जान भी देंगे सौ.शारदा राजबिंडे यांनी ए मेरे वतन के लोगो, दिपाली कुलकर्णीने जयोस्तुते श्री महन्मंगले, प्रा.रामेश्वर नरवडे यांनी जहा डाल डाल पर सोनेकी, हे राष्ट्र देवतांचे, अमृता नरवडे हिने तेरी मिट्टी मे मिल जावा, व्यंकटेश व्यास यांनी ‘संदेसे आते है’ तर ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’ सत्यम शिवम सुंदरम, व हे गीत निकिता बंड हिने, ऍड.केदार शर्मा आणि बाबासाहेब कवडे यांनी एकत्रितपणे ‘है प्रीत जहा की रीत सदा’ हे बहारदार गाणं गाऊन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तसेच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले माजी सैनिक सपत्नीक या कार्यक्रमाला हजर होते.
माजी सैनिकांसाठी तसेच शहिदांसाठी अर्पण असलेल्या या देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रमाने संपूर्ण परतुरकरांची मने जिंकून घेतली. मान्यवरांनीही देवर्षि संगीत विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.लंका सोनवणे यांनी केले तर शेवटीआभार आयोजक देवर्षि संगीत विद्यालय आणि संयोजन समिती परतुर च्या वतीने प्रा.रामेश्वर नरवडे सर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप पाटील, सुरेश डहाळे,रामेश्वर राजबिंडे, रोहित कपाळे,डॉ.नरसिंग गुंजकर, डॉ.दीपक दिरंगे, विनोद जईद, एकनाथ तरासे, ज्ञानेश्वर काळे ,शिवम नाईकनवरे, प्रा.अनंत मगर,प्रा.शंकरराव वांजुळकर, तेजस लोमटे, यश काकडे, पार्थ रायमुळे, सोपान सांगुळे आदींनी परिश्रम घेतले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!