Live
धर्म दर्पण

बंधु प्रेमासाठी राज्य त्याग करणार्‍या भरताचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा -ह.भ.प. रामराव महाराज ढोक

परतूर/प्रतिनिधी- बंधू प्रेमासाठी रामाने राज्य सोडले भरताने राज्यपद व आपण मात्र एकमेकांविरुद्ध वेगळ्या दिशेने वागतो एखादी घटना मनाविरुद्ध घडली तर अनेकांच्या घरी कलह निर्माण होतो मिथिलेच्या राजा ची कन्या विश्वाच्या राजा ची पत्नी १४ वर्ष वनवासात कशी राहिली हेच आपण शिकले पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प. रामराव महाराज ढोक यानी केले गरिबांना मदत दानधर्म, गुरुमाता पिताचा सम्मान व आईची सेवा केल्यास आपल्याला निश्चितच आपल जीवन सार्थक झाल्या सारखे वाटेल असे ही ते म्हणाले मा. आ. सुरेशकुमार जयलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथील अयोध्या नगरीत सुरु असलेल्या रामकथेच्या चौथ्या दिवशी ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी राम वनवासात जात असतानाचे वर्णन सदर्भासह इष्टांत देऊन विशद केले. या वेळी भाविक मंत्रमुग्ध होऊन कथा श्रवण करताना दिसत होते.
” उठा जागे व्हावे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माची” या संत नामदेव महाराजांच्या अभंगावर ढोक महाराजांनी या वेळी चिंतन मांडले. महाराज म्हणाले, जन्माला येणार्‍या प्रत्येकाची श्वसन प्रक्रिया सुरु आहे. बसलेले असताना मिनिटाला 12 वेळा, चालताना 18 वेळा, झोपेत 24 आणि मद्यप्राशन केल्यानंतर 30 वेळा श्वास आत बाहेर सोडला जातो, असे दिवसभरात 21 हजार 600 वेळा श्वास आत बाहेर सोडण्याची प्रक्रिया होते. तोपर्यंत त्याला त्याचे महत्त्व कळत नाही. मात्र; मृत्यूनंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबते. त्यावेळी कितीही पैसे मोजले तरी देखील पुन्हा श्वसन प्रक्रिया पूर्ववत होत नाही. म्हणून मानवाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आयुष्य आहे. संसार हा समुद्र आहे. संत स्वतः जागे असतात, म्हणून ते आपल्याला जागे व्हा असे सांगतात, त्यांना तो अधिकार आहे. आपण सगळे जागे आहोत. संसारात परमार्थासाठी आपण सगळे झोपेत आहोत. जन्माच्या व्यथा चुकविण्यासाठी संत उपदेश करतात. परमार्थाचे विस्मरण होऊ देऊ नका. जागे व्हा, आणि परमार्थ करा. संसार करत असताना धन, घर, पत्नी, पुत्र, बंधू, सगेसोयरे, समाज याची गरज आहे. मात्र, या सर्व गोष्टी मिथ्य आहेत. त्या आपल्याला सत्य वाटतात आणि परमार्थ हा सत्य आहे. तो आपल्याला मिथ्य वाटतो. सत्य ते मिथ्य व मिथ्य ते सत्य वाटण्याचे कारण म्हणजे माया आहे. माया असलेले लपवते आणि नसलेले दाखवते. मी आणि माझे म्हणणे म्हणजेच माया होय. ज्याला आपण माझे म्हणतो ते सर्व इथेच राहते. आयुष्याचे सत्य संतसंगती व परमार्थ यातच आहे. त्यामुळेच मुक्ती मिळू शकते असे ह.भ.प. रामराव महाराज ढोक शेवटी म्हणाले.
दरम्यान कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री,मा.ना.संदिपानजी भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महानंदा दूधसंघ चे संचालक नंदलालजी काळे,जयप्रकाशजी चव्हाण,मोहनजी अग्रवाल,प्रेमसेठ लोहिया,श्रीकिशनजी पाल्लोड,गोपालदासजी राठी हिंगनघाट,लोहियाजी कुंभार पिंपळगाव,पप्पू सेठ दहाळ,सत्यनारायानजी सारडा,सुभाषजी बाहेती अंबाजोगाइ,माधवराव मामा कदम,बद्रीभाऊ ढवळे,मदनलालजी चांडक,कांतासेठ सोमणी,जनार्धन मिंड,अचितराव सोळंके,अंकुशराव बीडवे,भगवानराव तणपुरे,ज्ञानोबा पवार,बांडगे साहेब,दामोधार बालकुंड,प्रभाकर खंदारे,डॉ.संदीप चव्हाण,डॉ.दत्तात्र्य नंद,बालरोग तज्ञ डॉ.मंत्री, डॉ.भानूदास कदम, डॉ.कमलचंद सकलेजा,सुभाषराव जोगदंड,संदिपान खरात,राहूल सातोनकर, मनोहर खालापुरे,बबनराव उन्मुखे,महेश होलाणी,तालुका अध्यक्ष बाबाजी गाडगे,जि.प.सदस्य इंद्रजीत घनवट,अविनाश शहाणे,सचिन लिपने,पांडुरंग गाडगे,यांच्या सह परिसरातील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!