Live
जालना दर्पण

दुधना शिक्षक पतसंस्थेस राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार २०२२ सन्मानपूर्वक प्रदान !

मंठा (प्रतिनिधी)-दुधना जि.प.शिक्षक सह.पतसंस्था मर्या.मंठा जि.जालना संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा  इतर संस्थांना रोल मॉडेल ठरेल अशा संस्थाना दिला जाणारा  सहकार क्षेत्रातील अत्यंत मानाचा ” राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२२” मा.ना.उदयजी सामंत,उद्योगमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खजिनदार दादाराव तुपकर यांच्या हस्ते दि.१९ सप्टेंबर २०२२, सोमवार रोजी गणपतीपुळे येथे प्रदान करण्यात आला.दुधना पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष भगवान जायभाये, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, रोखपाल योगेश खरात आदींनी पुरस्कार स्विकारला.सहकार क्षेत्रातील नामांकिन्त दिपस्तंभ पुरस्कार संस्थेच्या शिरपेचात मानाचा राहील.या दैदिप्यमान यशाबदल सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!