Live
जालना दर्पण

दुधना शिक्षक पत संस्थेचा आदर्श राज्यातील संस्थांनी घ्यावा – राजेश सुर्वे

मंठा दुधना जिल्हा परिषद सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या 6 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दि.11 सप्टेंबर रविवार रोजी सरस्वती मंगल कार्यालय
तळनिफाटा येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना मंठा येथील दुधना सहकारी शिक्षक पतसंस्थेचा आदर्श राज्यातील पतसंस्थांनी घ्यावा असे शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांनी सांगितले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय देशमुख प्रदेश सहसंघटक प्रमुख सहकार भारती हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून
राजेशजी सुर्वे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विक्रमजी अडसूळ राज्य संयोजक, नारायण मंगलाराम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा हार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन सतीश लोमटे व राजीव हजारे यांनी केले तर प्रास्ताविक दुधना पत संस्थेचे अध्यक्ष भगवान जायभाये यांनी केले.
या वेळी विजय देशमुख राजेशजी सुर्वे,विक्रमजी अडसूळ,नारायण मंगलाराम,सोमनाथ वाळके,इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून दुधना शिक्षक पतसंस्थेने केलेल्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांनी बोलताना सांगितले की दुधना शिक्षक सहकारी पतसंस्थेने अवघ्या सहा वर्षात मोठे यश संपादन केले असून या पत संस्थेचा आम्ही आदर्श डोळ्या समोर ठेऊन काम करत आहोत.या क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करत असलेल्या संस्थांना दुधना पत संस्थेने मागे टाकले आहे.त्यामुळे राज्यातील पत संस्थांनी या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच काम करायला पाहिजे.शिक्षक पत संस्था ह्या शिक्षकांचा समाजात मान सन्मान वाढवणाऱ्या असल्याने शिक्षकांनी इतर बँकाच्या फेऱ्यात न पडता आपल्या ठेवी शिक्षक पत संस्थेतच ठेवल्या पाहिजेत.आपण आपल्या संस्थांचे भाग भांडवल वाढवून सक्षम करायला हव्यात यातच आपला स्वाभिमान आहे.असे सांगून संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या संच्यालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
—————–
दरम्यान दुधना सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्र प्रमुख, शिक्षक व कोरीना काळात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिराचे आयोजन l
या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शिक्षक परिषद व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.या वेळी शिक्षक परिषदेच्या 47 शिक्षकांनी रक्तदान केले.
शिक्षक पत संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम यशस्वितेसाठी के. जी. राठोड, कल्याण बागल, संजय भवर, गजानन शिवपुरे,कैलास उबाळे,दिपक बागल,गणेश खराबे, अमोल सोनटक्के, दत्तात्रय राऊतवाड, किसन खरात,काशिनाथ गोंडगे, भारत गडदे, राधाकिसन सोममारे, दिपक अंभुरे, सखाराम मुजमुले, एन. जी. पठाण, भीमराव खरात आदीसह शिक्षक बांधव उपस्थित होते .


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!