Live
हिंगोली दर्पण

हिंगोली जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार – हिंगोली भाजपा जिल्हा प्रभारी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

प्रतिनिधी-भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकतीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या सरकारने एक छदामही विकास कामांसाठी खर्च केलेला नाही असे असताना किंवा केंद्र सरकार व मागील काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील विकास कामे सुरू आहेत मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारी मराठवाडा वॉटर ग्रीड या सरकारने रद्द केले असून ग्रीडविषयी सरकारच्या मनात पाप आहे अशी घणाघाती टीका हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

हिंगोली येथे भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरम्यान लोणीकर बोलत होते यावेळी मराठवाडा सहसंघटनमंत्री संजय कोडगे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव आमदार तानाजीराव मुटकुळे माजी आमदार गजाननराव घुगे माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना लोणीकर यांनी सांगितले की तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणीच्या काळात ५० हजार कोटी रुपयांची मदत केली त्यासाठी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी देखील पुढाकार घेतला होता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून ६९ हजार कोटी रुपये मराठवाड्याच्या विकासासाठी मिळाले हे सरकार मात्र करंटे सरकार असून विकास कामासाठी एक छदाम देखील खर्च करू शकत नाही मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामधून शेतीला उद्योगाला आणि पिण्यासाठी पाणी मिळणार होते परंतु सरकारच्या मनात मराठवाडा वॉटर बाबत पाप असून वॉटर ग्रीड बंदच करायची असा घाट सरकारने घातला आहे असे ते म्हणाले .

सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा हिंगोली जिल्हा प्रभारी भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतला त्यात हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात ५४९ ग्रामपंचायती असून त्यापैकी ३९६ ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या सुरू आहे एकूण हिंगोली जिल्ह्याचा विचार केला असता ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून त्यातील ३० ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व आहे एकूण ३९६ ग्रामपंचायती पैकी २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास हिंगोली जिल्हा प्रभारी भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले आढावा बैठकीदरम्यान माहिती घेताना लोणीकर यांनी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष तालुका सरचिटणीस यांना वस्तुनिष्ठ माहिती देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असून विकासाच्या मुद्द्यावरच अधिकाधिक ग्रामपंचायती निवडून येतील असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले मराठवाडा वॉटर ग्रीड बरोबरच ग्रामीण भागात निर्माण केलेली विजेचे जाळे पाणीपुरवठ्याच्या योजना डांबरीकरणाचे रस्ते गावांतर्गत सुविधा अशा अनेक मुद्द्यांना घेऊन भारतीय जनता पार्टी जनतेसमोर जाणार आहे व त्यावरच ग्रामपंचायतीची निवडणूक भारतीय जनता पार्टीचे पॅनल लढणार आहेत असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले ग्रामपंचायत या सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा आत्मा असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरीव काम व्हावे बरोबर गावाला मिळाला उत्कृष्ट काम व्हावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेत अधिकाधिक ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे असेही पुढे बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले

यावेळी जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, मिलिंद चंबल, प्रशांत सोनी, संदीप वाकडे, नारायण खेडकर, केके शिंदे, कृष्णा ढोके, बंडू कहाळे, ओम कोटकर, राहुल मेने, अजय कदम, नाथराव कदम, शंकर बोरुडे, गणेश शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!