Live
महाराष्ट्र दर्पण

जन्माष्टमी 18 की 19 ऑगस्टला ?

मुंबई (प्रतिनिधी )-भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. पौराणिक माहितीनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला दिवशी रोहिणी नक्षत्रात रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाचा देवकीच्या पोटी जन्म झाला. पण, या वर्षी जन्माष्टमीच्या तारखेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतातील विविध राज्यात अत्यंत उत्साहात जन्माष्टमी साजरी केली जाते. यंदा जन्माष्टमी १८ ऑगस्ट कि १९ ऑगस्ट या तारखेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर ज्योतिषाचार्य भागवत गुरु यांनी सांगितलं की, ‘यावर्षी जन्माष्टमीच्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.”श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला होता. हा योग १८ ऑगस्ट रोजी जुळून येतोय. पण, काही लोकांचं असं मत आहे की, १९ ऑगस्ट रोजी पूर्ण दिन अष्टमी तिथी राहिल आणि याच तिथीला सूर्योदयही होईल. त्यामुळे जन्माष्टमी १९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल.”असं असलं तरी धार्मिकदृष्टीने बघायचं झालं, तर श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रात्री १२ वाजता झाला होता. त्यामुळे जन्माष्टमी उत्सव १८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल’, असं ज्योतिषाचार्य भागवत गुरु यांनी सांगितलं.
यावर्षी जन्माष्टमी रोहिणी नक्षत्रात साजरी करता येणार नाही
ज्योतिषाचार्य भागवत गुरु यांनी जन्माष्टमी उत्सवाबद्दल सांगितलं की, ‘भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील कृष्ण पक्षातील आठव्या तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता. त्यामुळे रोहिणी नक्षत्राचं खूप महत्त्व आहे. मात्र, यंदा १८ आणि १९ ऑगस्ट अशा दोन्ही तारखांना रोहिणी नक्षत्राचा योग जुळून येत नाही. यंदा रोहिणी नक्षत्र २० ऑगस्ट रोजी सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होईल आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी संपेल. त्यामुळे यंदा रोहिणी नक्षत्राशिवाय जन्माष्टमी साजरी होणार आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!