Live
जालना दर्पण

व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना, दि. 9 (वृत्तसंस्था):- अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जे विदयार्थी सन 2021-22 या वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत होते व ज्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात वैद्यकिय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र वा तत्सम व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थापैकी ज्या विद्यार्थांनी अद्यापही जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले नाहीत अशा विदयार्थांनी तसेच एमबीए, बीएड, एलएलबी, एमसीए, तंत्रनिकेतनच्या तिस-या वर्षात शिकणारे विदयार्थी तसेच ज्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेमार्फत (CET) होतात अशा विद्यार्थांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विनाविलंब सादर करावेत.
जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भरावेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट डाऊनलोड करुन त्यामधील फॉर्म-15A वर संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक त्या कागदपत्रांसह समितीकडे तात्काळ दाखल करावी.
तसेच ज्या विद्यार्थांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत व ज्यांना समितीने त्रृटीपत्रे पाठविली आहेत, अशा अर्जदारांनी अर्जातील त्रृटींची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीचे सदस्य अधिकारी तथा सदस्य सचिव प्रदिप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!