Live
जालना दर्पण

जातीय सलोखा अभियाना अंतर्गत आष्टी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर-सपोनि सह ग्रामविकास अधिकारी सह ३८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आष्टी (राजेश्वर नायक ):- आष्टी ता परतूर येथे आज दिनांक १५ रोजी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित “जातीय सलोखा अभियान” अंतर्गत येथील पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप सावळे सह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा आष्टी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी डी.बी काळे, स्वागत जगधने,विनोद वाघमारे.राणोजी पांढरे, बाबासाहेब चौरे,विनोद थोरात, नवनाथ आगलावे,दत्तात्रय सोळंके,हनुमान गुंजाळ,ज्ञानेश्वर थोरात,गोविंद सोळंके,शेख इरफान,निहाल शेख, सह आदींनी रक्तदान केले या वेळी आष्टी, भगवान नगर, गोळेगाव, लोणी, कोकाटे हदगाव व ब्राम्हणवाडी येथील नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आजच्या या शिबिरात ३८ रक्तदात्यांनी आपले योगदान देत रक्तदान करीत खरा जातीय सलोखा चा संदेश दिला या वेळी सपोनि संदीप सावळे म्हणाले की तुम्ही केलेल्या रक्तदाना मुळे इतरांचे प्राण वाचवण्यात मदत होते तर ग्रामविकास अधिकारी म्हणाले की प्रत्येक सुदृढ व्यक्तीने रक्तदान करायला हवे या सारखे दुसरे कोणतेच दान नाही रक्तदान सोबत अवयव दान करण्यामुळे देखील अनेकांना जीवदान मिळू शकेल असे मत दोघांनी या वेळी व्यक्त केले रक्तसंकलन करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढीचे वंदना शेळके,मनीषा पटेल, डॉ राजकुमार झंवर, प्रवीण दुर्गम,अभिजीत जोशी यांनी कार्य केले तर या वेळी आष्टी पोलीस ठाण्यातील कर्मचारी ,गावातील तरुणांनी देखील या रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी पोलीस कर्मचारी नंदकिशोर गव्हाणे सह पोलीस कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!