मंठा(प्रतिनिधि) – सहकार भारती जालनाच्या वतीने मंठा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्या सत्कार सोहळ्यात जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखेडे बोलत होते.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना संबोधित करतांना त्यांनी सोसायटीने गाव पातळीवर नवनवीन संधी शोधून त्या मध्ये काम करावयास हवे. सोसायटीना सर्व क्षेत्रात काम करता येत असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रात काम करून सोसायटीला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवावे असे आवाहन केले.
यावेळी निवृत्त विभागीय सहनिबंधक (JTR ) तथा सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख विनायक साखरे , चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, होळनाथे जि. धुळे तथा सहकार भारतीचे विविध कार्यकारी सोसायटी प्रकोष्ट प्रमुख (म. राज्य ) प्रकाश सिसोदिया आणि सहकार भारतीचे विविध कार्यकारी सोसायटी सहप्रकोष्ट प्रमुख भगवान मापारे यांनी सखोल मार्गदर्शन केले.मार्गदर्शना नंतर सर्व नवनिर्वाचित चेअरमन आणि संचालक मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार आणि पाहुणचार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा सहनिबंधक संजय भालेराव,सहकार भारतीचे प्रांत संघटक विजय देशमुख,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिपक मरकड,भास्कर कोल्हे, विजय परदेशीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सतीश निर्वळ तर आभार भगवान जायभाये यांनी मानले.


