Live
जालना दर्पण

माजी शहराध्यक्ष संजय राऊत यांची भाजपाला सोडचिठ्ठी

परतूर (लक्ष्मीकांतजी राउत) – परतूर शहर भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय तुकारामजी राऊत यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला हा मोठा धक्का समजला जातो.
परतूर शहरातील ओबीसी चेहरा असलेल्या संजय राऊत यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत हे तीन वर्षांपूर्वी भाजपचे शहराध्यक्ष होते.तरुण वर्गात लोकप्रिय असल्याने व विविध सामाजिक उपक्रमात हिरहिरीने सहभाग घेत असल्याने तरुणांचा मोठा जनसंपर्क त्यांच्याकडे आहे.त्यामुळे शहरातील गावं भागात भाजपा साठी हा मोठा धक्का समजला जात आहे. लवकरचं पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते.
शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची पुनर्रचना करून नव्याने शहरात राष्ट्रवादी काँग्रेस चा दबदबा निर्माण करण्यासाठी जोराचे प्रयत्न चालवले आहेत,माजी नगराध्यक्ष विनायक काळे,माजी नगरपरिषद उपाध्यक्ष अखिल काजी,माजी नप उपाध्यक्ष विजय नाना राखे हे यासाठी प्रयत्नशील आहेत.त्याचाच एक भाग म्हणून शहरात इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले राजेश अंकुशराव तेलगड यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरात आणखी मजबूत होऊ शकते. येणाऱ्या काही दिवसात ईतर पक्षातील काही मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!