Live
जालना दर्पण

मंत्री बाल रूग्णालय परतुर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित

परतुर(प्रतिनिधी)- ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालना महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा जालना, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मदनलाल सिताराम अग्रवाल, स्व. श्रीमती सावित्रीबाई कचरूलाल राठी यांच्या स्मृत्यर्थ 20 ऑगस्ट शनिवार रोजी परतुर येथील मंत्री बाल रुग्णालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजूंनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आव्हान आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
कर्करोगाचे निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष ललीत गांधी व महामंत्री संदिप भंडारी यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालनाच्या वतीने दि. 20 व 21 ऑगस्ट दरम्यान कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत परतुर येथे 20 ऑगस्ट रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ज्यात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि ब्राँकायटिस कर्करोगच्या तपासण्या मोफत होणार आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम विथऑल सेटअप व्हॅनद्वारे उपस्थित राहून मोफत तपासणी करेल.
कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगाने आपला जीव गमवावा लागतो. बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार, व्यसनं आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. भारतात दरवर्षी सुमारे १.१ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. कर्करोगाच्या दोन तृतीयांश प्रकरणाचे निदान शेवटच्या टप्यावर होते, ज्यामुळे रुग्णांची जगण्याची शक्यता कमी होते. योग्य वेळी निदान झाल्यास प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचा उपचार होउ शकतो. नंतरचे उपचार अधिक खर्चिक आणि तुलनेनं कमी प्रभावी ठरतात. त्यामुळे सुरुवातीच्या स्तरांवर उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव जावू शकतो.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परतूर – मो. 8983080000, 9923026007 या मोबाईल क्रमांकावर पुर्व नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. ह्या मोफत शिबिरांचा जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालनाचे अध्यक्ष वीरेंद्र रुणवाल, सचिव दिनेश बरलोटा, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनचे विरेंद्र धोका, प्रकल्प प्रमुख संजय बंब, मनोज मुथा, डॉ स्वप्नील बी. मंत्री, डॉ लता पुरी, डॉ सुप्रिया मंत्री, डॉ महेंद्र पाटील, निहित सकलेचा, डॉ अक्षय सकलेचा, सौरभ बगडीया, आश्विन दायमा यांनी केले आहे.

कॅन्सरप्रती जागरूकता निर्माण होणे गरजेचे- डॉ. स्वप्नील बी. मंत्री

योग्य वेळी निदान झाल्यास प्राथमिक अवस्थेतील कर्करोगाचा उपचार होउ शकतो. नंतरचे उपचार अधिक खर्चिक आणि तुलनेनं कमी प्रभावी ठरतात, ही बाब विचारात घेऊन कॅन्सरच्या प्रारंभिक तपासणीची निशुल्क उपलब्ध करून देणे, कॅन्सरच्याप्रती जनतेला जागरूक करणे, यासाठी हे अभियान असल्याची माहिती मंत्री बाल रूग्णालयाचे संचालक डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्र कॅन्सरमुक्त करणे हा उद्देश- निहीत सकलेचा

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी मनात धडकी भरते. मात्र, आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली असून, कॅन्सर प्रमाणेच अनेक असाध्य रोगांवरही उपचार उपलब्ध आहेत. वेळीच निदान व उपचारानंतर कॅन्सरसुध्दा बरा होउ शकतो, हे लोकांपर्यंत पोहचविणे हा कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचा उद्देश असल्याचे केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष निहीत सकलेचा म्हणाले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!