Live
वायरल दर्पण

रोज दीड GB , आख्खं गावं बिझी…

परतूर (श्याम सोनी)-देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेटच्या सकारात्मक वापराबद्द्ल अज्ञान असणाऱ्या तरूणाईचं भविष्य उध्वस्त करायला दीड GB कारणीभूत ठरणार आहे.आजची तरुणाई काय काम करायचे यापेक्षा दीड GB कसे संपवायचे यांतच गुंतून पडलीय,त्यामुळे आजची तरुणाई भविष्याचा काहीच विचार करत नाही. ( दीड GB मुळे तसा वेळच मिळत नाही). दीड GB कसा संपेल याचाच जास्त विचार करत बसलेली असते.हातात पुस्तक नाही, म्हणजे वाचन शून्य. लेखन तर खूपच दूरची गोष्ट.पण येणारा काळ हा फार भयंकर असेल.शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी नाही,हातात कोणतेच कौशल्य नसल्यामुळे धंदा करता येत नाही.किंवा कमीपणाची भावना.अजून काही वर्षांनी फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे.ही दीड GB कधी जीवावर उठेल आणि आयुष्य बरबाद करेल हे सांगता येत नाही.नेटचा वापर हा जेवणाबरोबर लोणचं जसे लाऊन खातो असा वापर हवा नाहीतर ,मानसिक रुग्ण ही व्हायला वेळ लागणार नाही.मित्रांनो नेटच्या मागे न पळता ,आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या रेस खुप मोठी आहे.पटतंय का बघा…
नाहीतर बसा (दिड GB) संपवत…..


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!