Live
भारत दर्पण

कोविड-१९ मुळे कमावत्या सदस्याचा जीव गमावलेल्या कुटुंबांना सरकार देईल पेन्शन!

नवी दिल्ली (वृत्त संस्था): कोविड-१९ मुळे कमावत्या सदस्याचा जीव गमावलेल्या कुटुंबांना निवृत्तीवेतनाचे आश्वासन केंद्र सरकारने शनिवारी दिले. अशा कुटुंबांसाठी विमा भरपाई ‘वाढीव आणि उदारीकरण’ करण्यात आले आहे. सरकारचा हा आदेश मार्च २०२० पासून अश्या सर्व घटनांसाठी लागू राहील.

“कुटुंबांना मदत करण्यासाठी, जीवनमान राखण्यासाठी, ईएसआयसी (एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन) पेन्शन योजनेचा लाभ रोजगाराशी निगडित मृत्यू प्रकरणांकरिता ‘कोविड’ मुळे मरण पावलेल्यांनाही देण्यात येत आहे. अशा व्यक्तींच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना सध्याच्या नियमांनुसार कामगारांनी काढलेल्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90% इतका निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्याचा हक्क असेल’ असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे.

हा आदेश २४-०३-२०२० ते २४-०३-२०२२ पर्यंतच्या अश्या घटनांवर लागू राहील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी कोविड -१९ मधील अनाथ मुलांना आधार देण्यासाठी केलेल्या अनेक उपाययोजनां व्यतिरिक्त हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कोविडमुळे जीव गमावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबाच्या मदतीसाठी कर्मचार्‍यांच्या ‘डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम’ अंतर्गत विमा लाभात वाढ आणि उदारीकरण करण्यात आले आहे, असेही सरकारने म्हटले आहे.

“त्यांच्या मृत्यूच्या अगोदरच्या १२ महिन्यांत ज्या नोकरदारांनी नोकरी बदलली असेल त्यांच्या कुटुंबियांनाहि हा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे,” असे सरकारने म्हटले आहे. कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत या योजनांचे सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्या आहेत.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!