Live
वायरल दर्पण

नक्की वाचा…

मा . प्रदीपकुमारजी लड्ढा-लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजु च्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल.. त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला..
ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..
तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाही च आहे.. आपण धरुन ठेवलंय सगळं … हे तर लक्षातच घेतलं नाही कधी . अरे, फक्त सोडायचा अवकाश….
आहे तो सगळा आनंदच आनंद..!

जीवन हे एकदाच आहे
आनंदी जगा!!


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!