Live
बीड दर्पण

पालकमंत्री ना .धनंजय मुंढे यांनी सोडवला पट्टीवाडगाव -हातोला रस्त्याचा प्रश्न

आंबेजोगाई (बाळासाहेब लव्हारे)-बीड जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी वयक्तिक लक्ष घालून पट्टीवडगाव हातोला पांदण रस्त्याचा प्रश्न सोडवला.
पट्टीवडगाव हातोला पांदण रस्त्याची मागणी या भागातील शेतकरी अनेक दिवसांपासून करत होते . विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागे. शेतात ये जा करण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः चिखल तुडवत जीव धोक्यात घालून जावे लागत होते . गेली 15 वर्ष या भागातील शेतकरी या प्रश्नासाठी आंदोलन उपोषण करत होते . अखेर शेतकऱ्यांनी नामदार धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन तात्काळ काम करण्याची विनंती केली.
VR नंबर नसतानाही सदरील रस्त्याचे मातीकाम करून मजबुतीकरण करण्याचे काम या भागातील युवा नेते विश्वंभर फड यांना करण्याचे निर्देश देण्यात आले.नऊ मे रोजी सोमवारी फड यांनी श्रीफळ फोडून पट्टीवडगाव हाताला पांदन रस्त्याचे काम सुरू केले होते. आज रोजी सदरील कामावरील दोन्ही साईडने नाली काम करून मातीकाम करण्यात आले आहे ,व या कामावर खडीकरण करून मुरूम टाकण्यात येणार असल्याचे विश्वंभर फड यांनी सांगितले . या भागातील शेतकरी प्रमुख्याने माजी सरपंच महादेव लव्हारे, बाळासाहेब लव्हारे , हनुमंत मडके, चंद्रकांत दादा वाकडे, तात्यासाहेब जाधव, ज्योतिबा जाधव , अंगद वाकडे , प्रवीण पितळे, मुंजाजी वाकडे, बळीराम पितळे, एडवोकेट केशव लव्हारे, धनंजय जाधव, बालासाहेब लव्हारे, शिवराज आप्पा शिगे, नरसिंग लव्हारे, बंडू लव्हारे या शेतकऱ्यांनी तात्काळ प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नामदार धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!