परतूर (लक्ष्मिकांतजी राउत)– मंठा तालुक्यातील आकणी येथे ४ नोव्हेंबर रोजी ओबीसी समाजाच्या कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्याना पाठिशी घालणाऱ्या ,पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी ,यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन देत मागणी करण्यात आली.
मंठा तालुक्यातील आखनी या गावात शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका गटाने चाकूने प्राणघातक हल्ला करून दोन युवकांना व एका विधवा महीलेला आणि तिच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. पीडितांची तक्रार घेवून त्यांना न्याय देण्याऐवजी, राजकीय दबावाला बळी पडून, गाव गुंडांच्या खोट्या तक्रारीची शहानिशा न करता उलट पिडीत आणि गरीब लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांनाच ८ दिवस तुरूंगात डांबण्याचा काम मंठा पोलीसांनी केल्याने पोलीसांच्या या अन्याया विरोधात परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना १९ नोव्हेंबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देवून न्याय देण्याची मागणी ओबीसी च्या वतीने करण्यात आली. यावेळी ओमप्रकाशजी चितळकर, प्रा. सत्संग मुंढे सर, भगवान पाटोळे, शिवाजी तरवटे, भगवान गायकवाड, शिवाजी भालेकर, नंदकुमार गांजे, पिडीत परीवार, तसेच ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.