Live
जालना दर्पण

छायाचित्रासह प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

जालना (प्रतिनिधी ):- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानूसार दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी दिली.
दि.1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादी जिल्ह्यातील 99-परतूर 100-घनसावंगी, 109-जालना, 102- बदनापूर व 103-भोकरदन या विधानसभा मतदार संघातील एकुण 1 हजार 650 मतदान केंद्र, पदनिर्देशित ठिकाणी बुधवार दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!