Live
बीड दर्पण

पट्टीवडगाव येथे संत भगवान बाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी

अंबाजोगाई( बाळासाहेब लव्हारे ) –तालुक्यातील पट्टीवडगाव या ठिकाणी राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या हर्ष उल्हासाने साजरी करण्यात आली. गेल्या वीस वर्षांपासून ही परंपरा अखंडित ठेवीत ग्रामस्थांनी ह .भ . प. प्रभाकर नाना झोलकर व ह .भ . प आदिनाथ महाराज लाड यांच्या दिनांक 28 व 29 रोजी दोन दिवसीय कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते
दिनांक 28 रोजी रात्री 8 ते 10 ह.भ.प. प्रभाकर नाना महाराज यांनी संत भगवान बाबा यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना त्यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकणारा आलेख भक्तांसमोर मांडला व तारीख 29 रोजी ह भ प आदिनाथ महाराज लाड यांनी संतांचा महिमा या अभंगावर कीर्तन करत असताना संत अनेक महाराष्ट्रात होऊन गेले परंतु भगवान बाबा हे नुसते संत नव्हते तर ते एक साधू होते पुढे बोलताना भगवान बाबा त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे शेवटी लाड महाराजांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळी दहा वाजता ग्रामस्थांच्या व बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ह.भ.प. आदिनाथ लाड महाराज यांनी श्री भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवान बाबा मंदिर उभारणीचे भूमिपूजन संपन्न झाले . यावेळी ज्येष्ठ समाजसेवक सोपानराव धोंडे, पंचायत समिती सदस्य बिभीषण गीते, युवक नेते राजवर्धन दौंड ,सोमणवाडी चे सरपंच मकरंद मुरकुटे यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी व सर्व स्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी मंदिर उभारणी कार्यासाठी निधी संकलन करण्याचा निश्चय उपस्थितांनी बोलून दाखवत शुभकार्याला अनेकांनी निधी जाहीर केला व या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. गावकऱ्यांच्या वतीने माधवराव गवारे माजी सरपंच यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!