Live
जालना दर्पण

मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 नियोजन संदर्भात बैठक संपन्न

मंठा (प्रतिनिधी )-क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ‘ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना तसेच तहसील कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 चे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली.
या बैठकीस क्रीडाधिकारी श्रीमती रेखा परदेशी, गटशिक्षणाधिकारी सतिष शिंदे ,क्रीडा संयोजक पंजाबराव वाघ, केंद्रप्रमुख टी. एम.गायकवाड साहेब,के. एम.मुळे साहेब,के. बी.कांबळे साहेब,के. एम.धोत्रे साहेब,व्ही. बी.बागल साहेब,ए. आर.शेख साहेब आदी उपस्थित होते.
त्याच बरोबर मंठा तालुक्यातील महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा आर के शिंदे, तळणी प्रशाला मुख्याध्यापक श्री आर एल चव्हाण ,शिक्षक परिषद अध्यक्ष श्री कैलास उबाळे ,तालुक्यातील क्रिडा शिक्षक म्हणून श्री काशीनाथ गोंडगे श्री शिवानंद नागरे,राठोड ए जी, पालवे पी एस, चव्हाण एस एस,तोगरे एस एम,काकडे एस डी,चव्हाण व्ही एस, भुजग एस एस,इम्रान पठाण, ए बी खंडागळे, ए एस खरात,थोरात ए एम,के पी कादे ,यादव व्ही एन, वैद्य बी एस,निकाळजे एफ एम,अच्युत राठोड, देविदास चव्हाण, फुपाटे व्ही एम,घुगे एस बी,खंदारे जी जी ,सामाले जि व्ही,गाडेकर डी टी, पाटील एस ओ, नाईक आर एस उगडे एस डी ,मानाटे व्ही बी,इत्यादी क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
मंठा तालुक्यातील विविध शाळातून आलेले शारीरिक शिक्षक तसेच क्रीडा प्रेमी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या दहा क्रीडा स्पर्धेच्या आयोजना संदर्भात तसेच विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली व दिवाळीच्या सुटल्यानंतर ९ नोव्होबर ते १९ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान या दहा खेळ प्रकारांच्या स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
या बैठकीस तालुका क्रीडा अधिकारी, श्रीम रेखा परदेशी यांनी क्रीडा विभागाच्या विविध योजना व क्रीडा स्पर्धा बाबत मार्गदर्शन केले तर क्रीडा संयोजक श्री पंजाबराव वाघ यांनी क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या बाबतीत मार्गदर्शन केले तर सर्वात शेवटी गटशिक्षणाधिकारी श्री सतिष शिंदे साहेब यांनी मंठा तालुक्यातील सर्वच शाळा यांनी क्रीडा स्पर्धा मध्ये सहभाग घ्यावा अशा सूचना तालुक्यातील मुख्याध्यापक यांना केल्या व मंठा तालुक्यातील सर्व क्रीडा स्पर्धा उत्कृष्ट पध्दतीने पार पाडू अशी ग्वाही दिली.
सदरील बैठकीत सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!