Live
धर्म दर्पण

सोयंजना येथे विनोदाचार्य श्री. ह.भ.प. योगेश महाराज आकात यांचे कीर्तन

परतूर (रामेश्वर नरवडे )-सोयंजना येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3 ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार विनोदाचार्य श्री. ह.भ.प. योगेश महाराज आकात यांची झाली. “चंदनाचे हात पायही चंदन | परिसा नाही हिन कोणी अंग|| या अभंगावर अत्यंत मार्मीक आणि विनोदी पद्धतीने निरूपण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कलियुगात वारकरी संप्रदायच संसाररूपी भव सागरातुन तारून नेऊ शकतो आणि त्यासाठी साधु- संतानी दाखवल्या वाटेने जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराजांनी केले.प्रसंगी संगीत साथ संगीत विशारद किशोर महाराज दिवटे
भजन सम्राट निवृत्ती दादा लकडे ,
मृदंग सम्राट तालमणी नरहरी तात्या निचळ ,भागवताचार्य विष्णुकांत महाराज शास्त्री पैठण , बंडू महाराज सिरसगाव , छत्रभुज बापू काकडे , श्रीनिवास महाराज , श्याम महाराज चव्हाण , दत्ता महाराज कदम , तुळशीदास महाराज ,नाना , शिवलिंग महाराज विनायक महाराज सोयंजनेकर यांनी केली . तसेच सर्व भजनी मंडळी गावकरी मंडळी व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!