नवी दिल्ली: १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आज संध्याकाळी ४ वाजल्यापासून कोविड -१९ च्या लसीकरणासाठी स्वत: नोंदणी करू शकतात. आरोग्य सेतूच्या अधिकृत हँडलवरील ट्विटमध्ये असे लिहिले आहे: “http://cowin.gov.in, आरोग्या सेतू अॅप आणि उमंगवर अँप वर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सुरु होईल. राज्य शासकीय केंद्रे व खासगी केंद्रांवर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी किती लसीकरण केंद्रे तयार आहेत यावर नेमणूक अवलंबून असेल. “
१८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी (Walk – in) ची सुविधा फक्त ४५ वर्षा पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांनसाठी उपलब्ध असेल.
जाणून घ्या कशी असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस….
1. www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.
2. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
3. तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका व Confirm वर क्लिक करा.
4. आपले आधार नंबर, नाव आणि जन्मवर्ष टाकून फॉर्म भरा.
5. Schedule Appointment वर क्लिक करा.
6. पिन कोड टाका (उदा.431501)
7. Session निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
8. लसीकरण केंद्र व तारीख निवडा.
9. Appointment book करून ती confirm करा.
10. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
11. हा मेसेज जपून ठेवा, लसीकरण केंद्रावर तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल.
आपण आरोग्य सेतू अँप वरून पण नोंदणी करू शकता. खाली दिलेल्या विडिओ मध्ये नोंदणीची प्रक्रिया समजून सांगितली आहे