Live
जालना दर्पण

आई – वाडीलापेक्षा मोठा देव नाही आणि मैत्री सारखे दुसरे नाते नाही- कवी प्रा. अनंत राऊत-
लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न

आष्टी (राजेश्वर नायक) :- आष्टी ता.परतूर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस व सहकार महर्षी स्व. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची विधीवत सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एल के बिरादार यांनी केले या वेळी कवि अनंत राऊत यांनी आपल्या कवितांच्या अप्रतिम सादरीकरणाने विद्यार्थींची मने जिंकली आणि अभ्यासाच्या दुनियेत रोज मग्न असणारी मुले आज मात्र कवि अनंत राऊत यांच्या काव्य वर्षाच्या आनंदात चिंब भिजून तान तणाव विसरून खळखळून हसू लागली कवी अनंत राऊत यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून “माय-बाप” ही कविता सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणारी ठरली जगात सर्वात मोठा धर्म मानवता आहे जगात सर्वात मोठा देव आपले आई वडील आणि जगात सुंदर मैत्री सारखे दुसरे नाते नाही जीवनात सच्चा मित्र असणे गरजेचे आहे. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती तो आहे ज्याच्या कडे आई- वडील आहे जीवन जगत असताना वडिलांचे पाय व आईचे घामाने भिजलेले हात लक्ष्यात ठेवा संकटातून सावरण्याची ताकत आई वडिलात आहे आई कर्म करते फळाची अपेक्षा न करणारी आपली माय असते रंग रूपाने जीवनात कोण पुढे जाणार हे ठरत नाही आपल्या कर्तुत्वाने प्रत्येक जण पुढे जात असतो या जगात अशी कोणतीच गोष्ट कठीण नाही आत्मविश्वास च्या जोरावरच आयुष्यात आपण यशस्वी होऊ शकतो स्वतःवर आत्मविश्वास ठेवा त्या ध्येया पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही .आजच्या तरुणाचे हातापायाच्या काड्या आणि शरीराच्या पत्रावळ्या प्रमाणे झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारे खूप आहे पण त्यांचे विचार आचरणात आणणारे किती आहे आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज बरोबरच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारखी महापुरुष आपली आदर्श असायला हवे अनेक यशस्वी व्यक्तीचे दाखले देत आपली इच्छा शक्तीच्या जोरावर काय करू शकतो हे दाखवून दिले तर “भोंगा” या कवितेला प्रेक्षकांनी टाळ्यांनी साद दिली “मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा”ह्या कवितेने वन्स मोअर मिळविला याप्रसंगी मंचावर कपिल भैय्या आकात कवि अनंत राऊत स पो नि संदिप सावळे प्राचार्य एल के बिरादार उपमुख्याध्यापक के बी जगताप पर्यवेक्षक वसंत धोंडगे,ओंकार काटे, भगवान थोरात,भागवत चव्हाण, सुनिल काटे,मोहन बाण, प्रविण चौरे, सत्तार कुरेशी, श्रीमती उर्मिलाताई खाडे ,बाबासाहेब बागल, माऊली सोळंके तसेच पत्रकार बांधव पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा अल्पपरिचय प्रा व्ही एस खेडकर यांनी करून दिला तर आभार माधव सरनाईक यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!