Live
जालना दर्पण

आष्टीत अवैध धंद्यांना उत पोलीस प्रशासना सह महसूल प्रशासनास अवैध धंदे चालक जुमानेना ! -अर्थ पूर्ण मैत्री तर नाहीना? जनसामान्यातुन उठत आहे सवाल

आष्टी(राजेश्वर नायक ) :- आष्टी सह परिसरात राजरोसपणे अवैध धंदे चालत असून मटका,देशी विदेशी,वाळू, मुरूम,गुटखा आदी धंदे बिनधास्त पणे चालत असल्याने प्रशासनास अवैध धंदे चालक जुमानत नसल्याचे चित्र आष्टी सह परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्या वरून पहावयास मिळत आहे
आष्टी सह परिसरात कल्याण मुंबई मटका,वाळू, मुरूमाची अवैध वाहतूक सह बंदी असणारा गुटखा,देशी विदेशीचा पूर अवैध वृक्ष तोड आदी धंदे राजरोसपणे चालत असून कभी कभी कार्यवाही करून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन कार्यवाही करत असल्याचा आव आणत आहे की काय असा प्रश्न सुरू असलेल्या अवैध धंद्या वरून दिसून येत आहे. तर देशी दारूची गाड्यावर बॉक्स च्या बॉक्स सर्रास वाहतूक करून ठिकठिकाणी विक्री होत आहे आष्टी पोलीस ठाण्यास सपोनी सोमनाथ नरके यांनी पदभार स्वीकारले पासून अनेक वेळा देशी, विदेशी, वाळू वाहतूक वर कार्यवाही करत आपल्या परिसरात अवैध धंदे चालू देणार नसल्याचे जणू कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला खरा मात्र कभी कभी च्या कार्यवाहीस अवैध धंदे चालक जुमानत नसल्याचे पहावयास मिळत आहे ठिकठिकाणी बुक्या थाटून कल्याण, मुंबई मटका बिनधास्त राजरोसपणे सुरु आहे या वर मात्र पोलीस प्रशासना कडून अद्याप कार्यवाही झाली नाही तर गुटखा,देशी विदेशी ची ठीक ठिकाणी बिनधास्त होत असलेली विक्री या वरून अवैध धंधे चालकावर किती प्रशासनाची छाप पडत आहे या वरून दिसून येत आहे एकंदरीत अवैध धंदे चालक प्रशासनास जुमानत नाही तर महसूल प्रशासन देखील वाळू माफियावर कभी कभी कार्यवाही करत असल्याने देखील रात्रीचा खेळ बिनबोभाट सुरूच आहे मात्र रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलीस प्रशासन मात्र मनावर घेत नसल्याने वाळू ची अवैध वाहतूक सुरळीत चालत असल्याचे दिसून येत आहे वनविभागाने देखील आष्टी परिसरात दुर्लक्ष केल्याने दिवस रात्र बिनधास्त लाकडाची वाहतूक होत असताना दिसुन येत आहे.
एकंदरीत महसुल, पोलीस प्रसाशासन,उत्पादन शुल्क,वनविभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आष्टी व परिसरात बिनधास्त पणे अवैध धंदे चालत असुन या कडे आष्टी पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी सोमनाथ नरके यांनी दखल घेऊन किमान त्यांच्या अखत्यारीत येत असलेल्या अवैध धंद्यावर कार्यवाही करून आपली आष्टी परिसरात अवैध धंदे चालू देणार नसल्याची प्रतिमा कायम ठेवावी तर महसुल विभागाने देखील बैठे पथक आदि उपाय योजना करून वाळु आणि मुरुमाची अवैध विक्री वर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असुन उत्पादन शुल्क व वनविभागाने देखील या अवैध दारू विक्री व अवैध वृक्ष तोड व वाहतुकीवर कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!