आष्टी(राजेश्वर नायक ):- आष्टी ता.परतूर येथे काल दिनांक 14 रोजी एका पत्रकारास मारहाण केल्याची घटना घडली या विषयी अधिक माहिती अशी की, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी येथील स्वराज्य वार्ता चे पत्रकार राहुल आवटे यांनी नदीपत्रात रेती भरत असतानाचे बातमी साठी फोटो चे फोटो काढल्याचे कारणावरून लिंबाजी उर्फ जिजा रंगनाथ शिंदे याने शिवीगाळ व धमकी दिल्याने आष्टी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार दिली होती दरम्यान काल दिं.14 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास लिंबाजी उर्फ जिजा रंगनाथ शिंदे हा त्याच्या भावाच्या हॉटेल मध्ये आला त्याने जेवण मागितले त्यास जेवण हि दिले मात्र जेवण झाल्यावर जेवणाचे बिल द्याचे का माझा अवैध वाळूचा व्यवसाय असले बाबत तू पोलीस स्टेशनला व तहसीलदार मॅङम ला फोटो काढून बातमी लावतो का असे म्हणत शिवीगाळ करून त्याच्या हातातील लाकडी दांड्याने काउंटरवरील होम थियेटर,पेतिं मशीन फोडून अंदाजे तीन हजाराचे नुकसान केले व आवटे यांच्या डाव्या पायाचे मांडीवर व पोटावर मारून जखमी करून डाव्या हाताचे करंगळीवर मुक्का मार दिला या वेळी त्याचा आवटे यांचा लहान भाऊ गजानन मध्यस्थी करून सोडवासोडवी करीत असताना त्यास देखील मारहाण केली व त्याचे गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी अंदाजे किमत पन्नास हजार रुपये जबरीने हिस्कावुन घेतली व तसेच गल्यातले अंदाजे सहा हजार रुपये जबरीने काढून घेतले व जाताना माझ्या अवैध वाळू धंद्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून राहुल आवटे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आज आष्टी येथील पत्रकारांनी आष्टी पोलीस ठाण्यास,उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाव्दारे पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्याच बरोबर आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.