Live
जालना दर्पण

चोरट्यांनी मारला पोषण आहारावर डल्ला ! आष्टी येथील उर्दू शाळेतील प्रकार

आष्टी (राजेश्वर नायक) :- आष्टी ता.परतूर येथील जिल्हा परिषद नुतन उर्दू शाळेच्या पोषण आहार असणाऱ्या गोडाऊन मधून चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून साडेसात कुंटल पोषण आहारावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली या विषयी अधिक माहिती अशी की,आष्टी येथे जिल्हा परिषद नुतन उर्दू शाळा आहे दिनांक 6 रोजी शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा कलीम बेग शाळेत आले असता शाळेच्या पोषण आहार असणाऱ्या गोडाऊनच्या शटर ला कुलुप दिसले नाही या वेळी त्यांनी शटर वर करून पहिले असता येथे असलेल्या डाळी,तेल, व तेरा कुंटल तांदुळा पैकी पोषण आहाराच्या तांदळा मधुन जवळपास साडेसात कुंटल पोषण आहाराचा तांदुळ कमी दिसून आला विशेष म्हणजे चोरट्यांनी शटरचे कुलुप देखील सोबत नेल्याचे मुख्याध्यापक यांच्या कडून सांगण्यात आले येथील उर्दू शाळा ही पहिली ते सातवी पर्यंत शाळा असुन येथे जवळपास ३९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या परिसरात आणखीन तीन शाळा आहेत ज्यात केंद्रीय कन्या शाळा, येथे पहिली ते सातवी पर्यंत शाळा असुन येथे २१३ मुली शिक्षण घेत आहेत तर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे पहिली ते चौथी पर्यंत १३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अश्या चार शाळेचा परिसर आहे या सर्व शाळेचे पोषण आहाराचे गोडाऊन स्वतंत्र असुन चोरट्यांनी केवळ उर्दू शाळेच्या पोषण आहाराच्या तांदळा वर डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटने विषयी केंद्र प्रमुख राम सोळंके यांच्याशी या पोषण आहार चोरी विषयी माहिती विचारली असता ते म्हाणाले मला या विषयी काही माहिती नाही चोरी कधी झाली हे आपण सांगत असल्या नंतर कळले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितली येवढी मोठी घटना शाळेत घडली पोषण आहाराचा साडेसात कुंटल तांदुळ चोरीला गेल्याची घटना केंद्र प्रमुखांना देखील माहित नाही किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले नसल्याचे केंद्र प्रमुख यांच्या बोलण्यावरून समजते तर या पोषण आहारच्या चोरी च्या गुन्हया विषयी आष्टीचे सपोनी संदीप सावळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की संबंधित शिक्षकांनी केवळ अर्ज दिला आहे आपण त्यांना बोलावले असुन ते आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगतिले दरम्यान या सर्व चारही शाळेच्या परिसरात रात्री तळीराम यांचा मुक्त संचार करीत असल्याने अनेक ठिकाणी मद्याच्या बाटल्या पडल्याने दिसून येत आहे. तर या शाळा आष्टी पोलीस ठाण्याला लागुनच आहेत हे विशेष.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!