Live
भारत दर्पण

संसदेवरील हल्ल्याच्या 22 व्या स्मृतिदिनी सुरक्षा व्यवस्था भेदून 2 तरुणांच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या, खासदारांची पळापळ, दोघांना अटक

दिल्ली -लोकसभेत आज 13 डिसेंबर रोजी संसद हल्ल्याला उजाळा देणारी घटना घडली. दोन व्यक्तींनी सभागृहा कामकाज सुरु असताना प्रवेश केला. या दोन्ही व्यक्तींनी व्हिजिटर गॅलरीतून लोकसभेत उडी मारली .या दोघांनाहि अटक करण्यात आली आहे. सभागृहाचे कामकाज ठप्प करण्यात आले आहे.
या घटने मुळे २२ वर्षा पूर्वी आजच्या दिवशी संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्या च्या स्मृती ताज्या झाल्या आहेत . 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. महिला आरक्षण विधेयकावरून झालेल्या गदारोळानंतर संसदेचे कामकाज 11.02 वाजता तहकूब करण्यात आले होते. यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेतून बाहेर पडल्या होत्या.साडेअकराच्या सुमारास उपराष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक ते बाहेर येण्याची वाट पाहत होते आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅम्बेसेडरमधील पाच दहशतवादी गेट क्रमांक 12 मधून संसदेत घुसले. त्यावेळी सुरक्षा रक्षक नि:शस्त्र होते.
हे सर्व पाहून सुरक्षा रक्षक त्या अ‍ॅम्बेसेडर गाडीच्या मागे धावला. त्यानंतर दहशतवाद्यांची कार उपराष्ट्रपतींच्या कारला धडकली. घाबरलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडे एके-47 आणि हँडग्रेनेड होते, तर सुरक्षा रक्षक नि:शस्त्र होते.अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक पत्रकार संसदेत उपस्थित होते. गोळ्यांचा आवाज येताच सीआरपीएफची एक बटालियनही सक्रिय झाली. त्यावेळी देशाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक बडे नेते आणि पत्रकार संसदेत उपस्थित होते. सर्वांना आत सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले.दरम्यान, एका दहशतवाद्याने गेट क्रमांक 1 मधून सदनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे सुरक्षा दलांनी त्याला ठार केले. यानंतर त्याच्या अंगाला लावलेल्या बॉम्बचाही स्फोट झाला. उर्वरित 4 दहशतवाद्यांनी गेट क्रमांक 4 मधून सदनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापैकी 3 तेथे ठार झाले. यानंतर शेवटचा उरलेला दहशतवादी गेट क्रमांक 5च्या दिशेने धावला, मात्र तोही जवानांच्या गोळ्यांना बळी पडला. सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली चकमक दुपारी चार वाजता संपली.
या घटने चा मास्टरमाइंड अफझल गुरू, एसएआर गिलानी, अफशान गुरू आणि शौकत हुसैन यांना संसदेवरील हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर 15 डिसेंबर 2001 रोजी अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने नंतर गिलानी आणि अफशान यांची निर्दोष मुक्तता केली, पण अफझल गुरूची फाशीची शिक्षा कायम ठेवली.शौकत हुसेनची फाशीची शिक्षाही कमी करून 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला दिल्लीतील तिहार तुरुंगात सकाळी 8 वाजता फाशी देण्यात आली.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!