Live
भारत दर्पण

सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली (वृत्त संस्था)देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर आज सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेची पूर्वसूचना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

आज दुपारी पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या नंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई परीक्षांसंदर्भात घोषणा केली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. 

शिक्षणमंत्र्यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि “अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे विद्यार्थी पुढील वर्गात जातील. जर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, तर ते कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा देऊ शकतात.”


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!