Live
महाराष्ट्र दर्पण

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गा नंतर अजून दोन महामार्गाची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था)-मोदी सरकारने महाराष्ट्रात मिशन महा समृद्धी हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये बहुप्रतिक्षित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकापर्ण झाले. आता लवकरच अजून दोन महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत व्हावा असं या महामार्गाची रुपरेषा आहे.
नागपूर मुंबईतील 16 तासांचं अंतर आता 8 तासांवर येणार आहे. तसंच नागपूरपासून पुणे हे शहर 17 तासांवर आहे. अशात नागपूर पुणे एक्स्प्रेस वेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या महामार्गामुळे नागपूर पुणे या शहरातील अंतर अवघ्या 6 तासावर येणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
नागपूर मुंबई आणि नागपूर पुणे या शहरातील अंतर कमी होणार आहे. यासोबत आता नागपूर ते गोवामधील अंतर कमी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केल्या घोषणेनुसार पुढच्या टप्प्यात नागपूर ते गोवा अशाप्रकारचा महामार्ग होणार आहे. या महामार्गामुळे गोवा, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र थेट गोवा असा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे.
राज्यात लवकरंच विविध जिल्ह्यांना जोडणारे सहा महामार्ग तयार केले जाणार असल्याची घोषणी आहे. यात औरंगाबाद ते पुणे महामार्ग, सूरत- नाशिक-अहमदनगर-सोलापूर- सोलापूर-बंगळुरु – हैदराबाद असाही एक साऊथमध्ये जाणारा महामार्ग, इंदूर-हैदराबाद, हैदराबाद- रायपूर, नागपूर – विजयवाडा, पुणे-बंगळुरु, या महामार्गांचा समावेश आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!