Live
जालना दर्पण

नवरात्रोत्सव 2022 साठी मंडळांनी परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत

जालना (वृत्तसंस्था):-  नवरात्रोत्सव 2022 साठी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून दिली जाणारी महाराष्ट्र्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये वर्गणी गोळा करण्यासाठीची परवानगी ऑनलाईन पध्दतीने देणे सुरु असून संबंधित नवरात्रो मंडळांनी charity.mharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन फॉर्म भरुन त्याला नवरात्रोत्सव मंडळाचा ठराव, ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, लाईट बिल, सर्व सभासदांचे आधार, पॅन कार्ड ची प्रत तसेच मागील वर्षी परवानगी घेतलेली असल्यास त्या परवानगीची प्रत व मागील वर्षीचे हिशोब पत्र स्कॅन करुन ॲटच करावे. फॉर्म भरण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन वेबसाईटच्या होम पेजवरील प्रणाली मार्गदर्शन या सदराखाली 41 क परवानगी मार्गदर्शन यामध्ये उपलब्ध आहे. अर्ज बरोबर व नियमानुसार असल्यास अर्जात नमुद ई मेलवर परवानगी पत्र पाठवण्यात येईल अथवा त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्याबाबत कळविण्यात येईल. ऑनलाइन पध्दतीने ईमेलवर परवानगी देण्यात येणार असल्याने कार्यालयास येण्याची आवश्यकता नाही. ज्या मंडळांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही त्यांनी त्वरीत परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त वि.स. मेंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!