Live
जालना दर्पण

आष्टी ग्रामपंचायत साठी 73 टक्के मतदान शांततेत

आष्टी (राजेश्वर नायक) :- संपूर्ण तालुक्याच लक्ष लागलेल्या आष्टी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आज दिं.18 रोजी मतदान प्रक्रिया शांतेत पार पडली यात एकूण 11331 मतदारां पैकी 8279 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सरपंच पदाची निवडणूक दुसऱ्यांदा परत जनतेतून होत असल्याने या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते सरपंच पदासाठी यंदा 7 उमेदवार असुन सदस्य पदासाठी तब्बल 73 उमेदवारासह एकूण 17 सदस्यांसाठी हे मतदान घेण्यात आले सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने सहा प्रभागासाठी 17 बूथ लावण्यात आले होते या पैकी 14 बूथ साठी येथील जिल्हा परिषद शाळेत तर उर्वरित 3 बूथ साठी जायकवाडी वसाहत भागातील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली होती मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली एकूण 11331 मतदारां पैकी 5952 पुरुष मतदार असून तसेच 5379 महिला मतदार आहेत अनेक प्रभागा मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या असुन सरपंच पदासाठी ही भाजपा ,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उमेदवारा मध्ये अटीतटी ची लढत होत आहे या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून एम. आर काळे यांनी काम पहिले या वेळी डॉ. अंनत गव्हाणे अप्पर जिल्हा अधिकारी औरंगाबाद तथा निवडणूक निरीक्षक जालना जिल्हा यांनी देखील आष्टी येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या या वेळी आष्टी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी डी.बी.काळे यांनी मतदाराच्या सोयीसाठी दिशानिर्देशक फलक ठीक ठिकाणी लावली सोबतच ठिकठिकाणी सावली साठी मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय सोबतच दिव्यांग्याना नेण्यासाठी व्हीलचेअर ची सुविधा देखील उपलब्ध केल्याने मतदारा मधून समाधान व्यक्त करण्यात आले होते प्रशासनाच्या वतीने बी.एल.ओ यांनी देखील मतदारांना त्यांचे नावे कोणत्या मतदार केंद्रात आहेत हे दाखवल्याने मतदारांना योग्य बुथ वर जाण्यास मदत मिळाली
क्षेत्रीय अधिकारी म्हणून आर एम काळे यांच्या सह मंडळ अधिकारी आए एस मोताळे ग्रामविकास अधिकारी डि बी काळे तलाठी विशाल घोरपडे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी काम पाहिले तर पोलीस प्रशासनाच्या वतीने एपीआय संदीप सावळे यांच्या सह अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गत वर्षी 70 टक्के मतदान झाले होते तुलनेत यंदा 3 टक्के मतदानात वाढ झाली तर गत वेळी एकूण 9903 मतदार संख्या होती ती वाढून यंदा एकूण मतदार संख्या 11331 एवढी झाली 1428 नवीन मतदारांची या वेळी वाढ झाली आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!