Live
जालना दर्पण

डबघाईला आलेल्या आष्टी बाजार समितीला नवसंजीवनी मिळणार का ? व्यवसाय च्या नावाखाली केवळ जागेचा बाजार ,माल खरेदी मात्र बंद ; चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

आष्टी (राजेश नायक)-कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी हि परतूर तालुक्यातील सर्वातमोठी असुन या बाजार समितीवर नुकतीच प्रशासकीय संचालक मंडळाची नेमणूक झाली आहे . नियोजना अभावी डबघाईला आलेल्या या बाजार समितीला नवसंजीवनी देण्याचे आव्हान येत्या काळात या नूतन संचालक मंडळ समोर असून बुधवारी संचालक मंडळाची पहिल्याच बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली . येत्या काळात या बाजार समितीला नवसंजीवनी देण्याचे नूतन संचालक मंडळाने ठरविले आहे
जवळपास ५० गावांशी संलग्न असलेल्या आष्टी येथील बाजार समिती ही तालुक्यातील परतूर नंतर ची सर्वात मोठी बाजार समिती आहे . मात्र गेल्या काही वर्षा पासून या बाजार समितीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे . या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मालाची उलाढाल होत नसून अनेकांनी या बाजार समितीच्या आवारात व्यवसाय च्या नावाखाली जागा घेऊन ठेवलेल्या आहेत .मात्र दमडी चा ही व्यवहार होत नसल्याने मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन ही थकलेले आहे . अशाच परिस्थितीत या बाजार समितीच्या संचालक मंडळाची कार्यकाळ संपल्याने महाविकास आघाडी सरकारने १८ प्रशासकीय संचालक मंडळाची या ठिकाणी नियुक्ती केली असून राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी शिवसेना आणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी संचालक मंडळ नियुक्त झाले. नूतन सभापती पदी रमेश सोळंके उपसभापती पदी बाबाजी गाडगे यांची वर्णी लागली. सचिव कैलाश मुजमुले यांच्या उपस्थितीत नवीन संचालक मंडळाची बुधवारी दिनांक ३ रोजी बैठक घेण्यात आली असून या बैठकीत नुतन संचालक मंडळाने विविध विषयांवर चर्चा होऊन वर्षानुवर्षे थकीत बाकीदार असलेल्या लायसन्स धारकांना नोटिसा देने, लायसन्स नूतनीकरण करणे, मोडकळीस आलेल्या इमारती पाडणे, व्यापाऱ्यांसाठी बीओटी तत्वावर जागा उपलब्ध करून देणे आदी विषयावर चर्चा झाली . नूतन काळात बाजार समिती ला नवसंजीवनी देण्याचे ठराव घेण्यात आले. या बैठकीला संचालक मधुकर खरात, भागवत कडपे, नीलकंठ तौर, बाळासाहेब ढवळे, सुखलाल राठोड सह आदी संचालक उपस्थित होते.
दरम्यान या ठिकानी अनेकांनी व्यवसायासाठी जागा घेतल्या खऱ्या मात्र या ठिकाणी व्यवसाय होताना दिसुन येत नाही. मात्र पक्की घरांची बांधकामे दिसुन येत असुन परवाना धारकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसारत दिलेल्या जागेत व्यवसाय केल्यास बकाल झालेली बाजार पेठेला चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही. नुतन संचालक मंडळ या कडे गांभीर्याने घेण्याची गरज असुन नुसतीच व्यवसाय साठी जागा घेणारे व या जागेत व्यवसाय न करणारे यांच्या वर हि कार्यवाही व्हायला हवी.
या विषयी कृ.उ.बा.समिती सचिव कैलास मुजमुले यांना संपर्क साधला असता ते म्हणाले या मार्केट मध्ये परवाना धारक 35 आडते व 48 खरेदीदार व्यापारी असुनही खरेदी विक्री होत नाही सध्या माल कोणीच घेत नाही येत्या दोन तीन दिवसात नोटीसा बजावणार असलायचे या वेळी सांगितले .आत्ता पर्यंत अनेक वेळा परवाना धारकांना नोटीस बजावण्याचा खेळ या पूर्वी हि झाला मात्र बाजार पेठे काही या ठिकाणी सुरु झालीच नाही . आत्ता नवीन संचालक मंडळ या वर काय उपाययोजना करेल किंवा कार्यवाही करेल हे येत्या काळात कळेलच.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!