Live
जालना दर्पण

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये सहभाग करण्यासाठी साखळी उपोषण

आष्टी (राजेश नायक)-महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सूची मध्ये समाविष्ट करून अनुसूचित जमाती प्रमाणे आरक्षण देण्यात यावे यासाठी धनगर समाजाच्या तरुणांनी साखळी पध्दतीने उपोषण सुरू केले आहे.
परतूर तालुक्यातील लोणी शिवारात माजलगाव आष्टी रस्त्यावर सदरील उपोषण सुरू केले असून धनगर या जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गा मध्ये सामावून घेण्याची मागणी उपोषण कर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
परतूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता आम्ही दि.1 फेब्रुवारी पासून मौजे लोणी शिवारातील टोलनाक्या जवळ रस्त्यावरील वस्तीवर उपोषण करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे तात्याराव बहिरे यांच्या नेतृत्वाखाली दि 1 फेब्रुवारी पासून धनगर समाजाचे तरुण साखळी उपोषणाला बसले आहेत.निवेदनावर प्रशांत शेळके,महादेव बहिरे,भास्कर सुरवसे,विष्णू बहिरे,किसन रोडे,धोंडिबा बिरले,रामा सुरवसे,उत्तरेश्वर बहिरे, सोमनाथ गडदे, सुधाकर बहिरे,संदीप बहिरे,दादासाहेब जंगम,ज्ञानेश्वर काळे,रघुवीर बहिरे,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!