Live
जालना दर्पण

आष्टीत चोरिचा प्रयत्न ; घरातले जागे झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला

आष्टी (राजेश नायक) :- आष्टी ता.परतूर येथील आष्टी – माजलगाव मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सुदैवाने घरातील मंडळी जागे झाल्याने चोरट्यांचा डाव फसल्याची घटना काल दिनांक 7 रोजी च्या रात्री घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की आष्टी-माजलगाव या मुख्य रस्त्यावर येथील व्यापारी शांतीलाल सिंगी यांचे घर असुन काल दिनांक 7 रोजी ते व त्यांची पत्नी त्यांचा मुलगा सुन असे घरातील नेहमी प्रमाणे जेवण करून झोपले असताना रात्री 2 वाजेच्या सुमारास काही तरी तोडण्याचा आवाज त्यांना आल्याने ते जागे झाले. या वेळी त्यांना घराच्या पाठीमाच्या गेट जवळ आवाज आल्याने त्याने तिकडे लक्ष दिले असता अज्ञात चोरट्यांनी गेट चे कुलूप तोडले असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी या वेळी आरडा ओरड करीत आजू बाजूच्या लोकांना जागे केले व त्यांचा परतूर येथे राहणार दुसरा मुलगा गौतम यास घराच्या पाठीमागे चोरट्यांनी चायनल गेट चे कुलुप तोडले असुन पोलिसांना खबर करण्यास सांगितले. या वेळी गौतम याने आष्टी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सुभाष सानप यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याच्या आगोदरच चोरट्यांनी घरातील आरडाओरडा व आजुबाजूचा आरडाओरडा होत असल्याने पोबारा केला. शांतीलाल सिंगी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आष्टीत चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु होते की काय आशी भीती नागरीकातून व्यक्त होत आहे. दैठणा येथे झालेल्या अनेक चोऱ्यांचा तापास अद्याप लागला नसुन आष्टीत देखील गेल्या दोन ते तीन वर्षात झालेल्या चोऱ्यांचा तपसा अद्याप लागलेला नसल्याने चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढू नये या साठी पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे. सध्या पोलिसांची गस्त जेथे मोठी गाडी जावू शकते तेथे सुरु आहे मात्र गावात गल्ली बोळात मोटारसायकल गस्त देखील वाढविण्याची गरज आहे.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!