Live
जालना दर्पण

माजी मंत्री तथा आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते डॉक्टर स्वप्नील बी. मंत्री यांचा सत्कार

परतूर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांचा रस्ता सुरक्षेसंबंधी उल्लेख करून त्याला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे आवाहन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते व ॲडव्होकेट मिलिंद जी पाटील प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा तथा जिल्हा प्रभारी जालना व राहुल भैया लोणीकर प्रदेश सरचिटणीस भाजयुमो यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर स्वप्नील बी. मंत्री यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. मंत्री यांच्या विविध समाजउपयोगी कार्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालूकाध्यक्ष भगवानराव मोरे यांनी दिली. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, डॉ. संजय पूरी, भाजपा भटके विमूक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष, परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर, मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ, सुनील शिवनगिरीकर, मुन्ना चितोडा, डॉक्टर्स, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका सर्वसामान्य नागरिकाचा व कार्यकर्त्याचा सत्कार केल्याबद्दल डॉक्टर स्वप्नील बी. मंत्री यांनी सर्वांचे धन्यवाद व आभार व्यक्त केले…


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!