Live
जालना दर्पण

केंद्र सरकारच्या विरोधात मंठा येथे शिवसेनेचा भव्य सायकल मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला … मोदी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणले—-ए जे बोराडे

मंठा/ प्रतिनिधी : मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील जनतेला ठेंगा दाखवला, केवळ अदानी अंबानी सारख्या बड्या उद्योगपतींना पोसणाऱ्या केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणले, पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेच पाहिजेत अन्यथा गंभीर परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी दिला. केंद्र सरकारच्या विरोधात भव्य सायकल मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. मंठा फाटा येथून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयात विसर्जित करण्यात आला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना जिल्हाप्रमुख श्री बोराडे बोलत होते, “जय भवानी – जय शिवाजी” शिवसेना जिंदाबाद, पेट्रोल डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेच पाहिजेत, हा आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले. मोर्चात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सायकली घेऊन मोर्चात सहभागी झाले . सायकल मोर्चाने मंठेकरांचे लक्ष वेधून घेतले तहसील कार्यालय तहसीलदार सुमन मोरे यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांना सायकल भेट देण्यात आली. कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन उद्ध्वस्त झाले असताना मोदी सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प दिशाभूल करणारा असल्याचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी सांगितले. या मोर्चात माजी सभापती संतोष वरकड, बाजार समितीचे संचालक तथा शहरप्रमुख प्रल्हादराव बोराडे, नगराध्यक्ष नितीन राठोड, श्रीरंगअण्णा खरात, तालुकाप्रमुख अजय अवचार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख डिगांबर बोराडे, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड, पंचायत समिती सदस्य मधुकर काकडे, बाबाराव राठोड ,नगरसेवक इल्यास कुरेशी, अरुण वाघमारे, बालासाहेब बोराडे, प्रदीप बोराडे, नीरज सोमानी, विभागप्रमुख बबन शेळके, विष्णुपंत खराबे,बाबासाहेब राठोड, हरीभाऊ जाधव, दासोपंत खरात, रामेश्वर शिंदे, महादेव वाघमारे, संजय बोराडे, वजीर पठाण, भागवत चव्हाण, संदीप बोराडे गुड्डू बोराडे नीलेश शिंगणे अशोक घारे, पवन मगर, राजू चव्हाण, शिवा बोराडे ,आदित्य चव्हाण ,सतीश राठोड, नितीन राठोड, नागेश सराफ, शरद मोरे, भारत राठोड, अनिरुद्ध काकडे, जमिर कुरेशी,युनुस कुरेशी,शमु कुरेशी, सुनील वायाळ, आसाराम बोराडे, परमेश्वर उबाळे, राम उबाळे, गोपाल गायकवाड, पांडुरंग पारखे, प्रताप जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!