Live
जालना दर्पण

सरपंच पदाच्या निवडणूक तारखा जाहीर-सदस्यांची पळवापळवी सुरू

परतुर(लक्ष्मीकांतजी राऊत) – तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपल्यावर सरपंच आरक्षण मुळे अडकलेले घोंगडे नुकतेच मोकळे झाले होते ,आरक्षण झाल्यानंतर आता सरपंच व उपसरपंच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने येणारा सरपंच कोणाचा यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर राजकिय पक्षांनी ग्रामपंचायत आमच्याचकडे म्हणून निरनिराळे आकडे समोर केले होते, आता सरपंच व उपसरपंच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत ताब्यात असलेले आकडे किती खरे याचा सोक्षमोक्ष होणार आहे. सरपंच कोणत्या पक्षाचा होईल यावर हे गणित अवलंबून आहे. परतुर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच निवडणूक तारखा या प्रमाणे, १० फेब्रुवारी रोजी वाटूर, सातोना खु,सातारा वाहेगाव,सिंगोना, आंबा,काऱ्हाळा, पाटोदा माव,पांडेपोखरी, रायपूर, सोयांजना, सिरासगाव, पिंपळी धामणगाव, संकनपुरी, सेलगाव,अकोली,सावंगी गंगा,बाबई, माव पाटोदा, बानाची वाडी. तर १२ फेब्रुवारी रोजी श्रीधर जवळा, सातोना बु,वैजोडा, लिखित पिंपरी, हातडी,सावरगाव, ब्राम्हण वाडी,सुरुंमगाव,लिंगसा, हनवडी,परतवाडी, वाहेगाव सातारा,कोकाटे हदगाव, डोल्हारा,नांदरा, अंगलगाव, मसला,वलखेड व आसनगाव .
या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून यासाठी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस प्रशासन ही कामाला लागले आहे. तर दुसरीकडे राजकिय नेते मंडळी सरपंच आपलाच कसा होईल यासाठी डावपेच आखताना दिसत आहेत. अनेक गावातील निवडून आलेले सदस्य सहलीवर गेलेले आहेत, तर काही गावातील निवडणूक झाल्यानंतरची राजकिय समीकरणे सदस्यांच्या पळवापळवी ने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!