Live
जालना दर्पण

नाईन-ए-साईड फुलबाँल स्पर्धा- सिटी बाँईज औरंगाबाद संघाला विजेतेपद

परतुर(विठ्ठल कुलकर्णी)-जय महाराष्ट्र क्रिडा मंडळ व व्यायामशाळा यांच्या तर्फे नाईन-ए-साईड फुलबाँल स्पर्धेत सिटी बाँईज औरंगाबादच्या संघाने पेनाँल्टीने मिलन बांईज बीड संघाचा 4-3ने पराजित करुन विजेतेपद पटकावले.
गेल्या तीन दिवसापासुन जि.प.प्रशालच्या मैदानावर सुरु असलेल्या नाईन-ए-साईड फुटबाँल स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला,सामन्याच्या वेळेत कुठल्याच संघाने गोल न केल्याने सामन्याचा निर्णय पेनाँल्टीवर झाला यात सिटी बाँईज औरंगाबादने मिलन बाँईज बीडचा 4-3असा पराभव केला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक श्री.शामसुंदरजी कौठाळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सर्वश्री.नगरसेवक अय्युब भाई कुरेशी,रहिमोद्दीन कुरेशी,संदिप दादा बाहेकर,कदीर कुरेशी,अखिल काजी,अँड.जगन्नाथ बागल,अजिस सौदागर प्रविण सातोनकर,कृष्णा आरगडे,जेष्ठ फुलबाँलपटु गवई मामा आदी उपस्थित होते.वैयक्तिक पारीतोषकात स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडु-जफर खान(बीड)तर्फे बाळासाहेब काळे,बेस्ट फाँरवर्ड-सोहेल खान(औरंगाबाद )तर्फे इजरान कुरेशी,बेस्ट डिफेन्स-शेहेबाज खान(बीड)तर्फे रफीक कुरेशी,बेस्ट किपर-अमीर कादरी(बीड)तर्फे तारेख सिद्दिकी.बेस्ट गोल-मेहराज खान(औरंगाबाद )तर्फे संतोष हिवाळे विजेत्या संघाच्या प्रत्येक खेळाडु ट्राँफी रशीद मास्टर यांच्या तर्फै देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सरफराज सर कायमखानी,सरवर कायमखानी,विठ्ठल कुलकर्णी,अमजद कायमखानी,शाकेर कायमखानी,नासेर चाऊस,राशीक कायमखानी,महादेव राऊत,हमीद कायमखानी,खलील पठाण,मोईज कायमखानी,मुजीब कायमखानी,समीर फारुकी,आरबाज बागवान,परवेज कायमखानी,सय्यद जिशान,काशीफ कायमखानी,मुदस्सीर कायमखानी,अरफात व शहेबाज कायमखानी यांनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन श्री.अखिल सर काजी तर आभार प्रदर्शन श्री.सरफराज कायमखानी यांनी केले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!