Live
भारत दर्पण

कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी 10 लाखांचा निधी, मोफत शिक्षण आणि इतर सुविधा देणार : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय

कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीत अनेक मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आहे. अशा मुलांसाठी मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यांनी योजना जाहीर केल्या आहेत. आता केंद्र सरकारनेही या मुलांसाठी पुढाकार घेतला आहे. कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना ‘पीएम-केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अशा मुलांचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक वेतन मिळणार आहे. तर 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. तसेच मुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यात मदत केली जाणार असून अशा कर्जावरील व्याज पंतप्रधान मदत निधीतून दिले जाणार आहे. अशा मुलांचा 18 वर्षांपर्यंत 5 लाखांचा आरोग्य विमा आयुष्मान भारत अंतर्गत काढण्यात येणार आहे. या विम्याचा हप्ता पीएम केअरद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान कार्यलयातून केली आहे.

हि बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू मुलांना मदत होईल.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!