मुंबई -एसटी प्रवास महागल्यानंतर आता रेल्वे प्रवाशांसाठी मात्र चांगली बातमी आहे. रेल्वे तिकीट दरात वाढ वाढ होणार नाही, अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.दानवे म्हणाले, ‘रेल्वे प्रवाशांसाठी चांगला प्रवास व्हावा यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. चांगली सुविधा देत असताना याचा भार तिकीट दरावर पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करण्याचा विचार नाही.’
स्टेशन वर मुक्काम -एसी पॉड 999 रुपयांत
तसेच प्रवाशांना 999 रुपयांत एसी पॉडमध्ये राहण्याचीही सोय करणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली . या पॉड मध्ये प्रवाशांना 999 रुपयात रात्रभर मुक्काम करता येईल. पहिली पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल स्टेशन वर बनवण्यात येणार आहे . या सह इतर 130 कोटी रुपयांच्या नवीन सुविधा आम्ही सुरू केल्या आहेत. भविष्यात आणखी योजना सुरू करू आणि नॉर्थ इंडियामधील राज्य आम्ही जोडण्याचा प्रयत्न करु, असे दानवे यावेळी म्हणाले.
काय आहे पॉड हॉटेल?
जपानी स्टाईलच्या या पॉड हॉटेलमध्ये (कँप्शूल)अनेक लहान कॅप्सूल किंवा पॉड्स असलेली एक इमारत आहे. या ठिकाणी प्रवाशांना रात्रभर मुक्काम करता येईल. स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर वेटिंग रूमसचा वापर यासाठी केला गेला आहे. सर्वात स्वस्त पॉडची किंमत, 12 तासांसाठी 999 रुपये असेल असं सांगण्यात येतय. पॉड्समध्ये इतर मूलभूत सुविधांव्यतिरिक्त वायफाय , एअर कंडिशनिंग , की कार्ड ऍक्सेस , आणि सीसीटीव्ही पण आहे.
फोटोंच्या माध्यमातून पॉड हॉटेल ची झलक