नवी दिल्ली(वृत्तसंस्था )-कोरोनाविरोधातील लढाईत भारताला आणखी एका अस्त्राची मदत मिळणार आहे. बंगळुरुमधील झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे डीसीजीआयला (DCGI) १२ वर्ष आणि त्यापुढील मुलांसाठी आपल्या ZyCoV-D लशीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. ही पहिली पालस्मिड DNA लस आहे. तसेच इंजेक्शन न वापरता फार्माजेट तंत्राचा वापर करुन ही लस दिली जाणार आहे.डीसीजीआयने परवानगी दिल्यास भारताला आणखी एक लस मिळू शकते. झायडस कॅडिलाची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पुर्ण झाली आहे. २८ हजार जणांवर चाचणी कारण्यात आली . डीएनएवर आधारित असणाऱ्या या लशीच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पार पडल्या आहेत. झायडस कॅडेलाने डीसीजीआयला निवदेन दिले आहे. ज्यात डीएनए लस Zycov-D च्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सादर केला आहे
डेटानुसार, Zycov-D हि लस १२ ते १८ वर्षांमधील मुलांसाठी प्रभावी आहे. कंपनीने दरवर्षी १० ते १२ कोटी लस उत्पादन करण्याची तयारी केली आहे. कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोडा यांनी सांगितलं की, झायडस कॅडिलाच्या लशीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. जुलैच्या शेवटापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यात १२ ते १८ वर्षांमधील लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यास सुरुवात होईल.
फार्माजेट तंत्रज्ञान काय आहे
झायडस कॅडिला ZyCoV-D कोरोना व्हॅक्सीन १२ से १८ वर्ष वयाच्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचे सांगितले जाते . ही लस फार्माजेट म्हणजेच सुई विरहीत (PharmaJet needle free applicator) च्या मदतीने दिली जाणार आहे. या प्रकरात सुई नसणाऱ्या इंजेक्शनमध्ये औषध भरली जाते. त्यानंतर त्याला मशीन लावून ती हातावर लावली जाते. मशीनवरील बटन क्लिक करुन औषध शरीरात प्रविष्ट केले जाते जाते.
भारतात आतापर्यंत चार लशींच्या वापराला परवानगी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुटनिक ५ आणि अमेरिकीची मॉडर्ना या लशींचा समावेश आहे. झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन वापरास परवानगी मिळाल्यास ती पाचवी लस ठरु शकते. शिवाय यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळू शकते.