Live
महाराष्ट्र दर्पण

ऋतुजा लटके विजयी

मुंबई (वृत्तसंस्था )-अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विजय झाल्या आहेत . मतगणने मध्ये पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेऱ्यांपर्यंत त्या आघडीवर होत्या. एकूण 53471 ऋतुजा लटके मतांनी विजयी झाल्या . हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे ,त्यांनी केलेल्या कामाची पावती जनतेने दिलीय अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटकेंनी दिली .
विशेषतः आता कोणत्याही पोटनिवडणुकीची झाली नव्हती एवढी चर्चा अंधेरी पूर्व विधानसभेची झाली. आधी पासून नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या या पोटनिवडणुकीची सकाळी मतमोजणी सुरु झाली सर्व फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर होत्या. त्यांना 66 हजार 247 मतं मिळाली . आश्चर्य हे कि त्यांच्यानंतर मिळालेली सर्वाधिक मतं कुणा उमेदवाराला नव्हे, तर नोटाला मिळाली . सर्व फेरीनंतर नोटाला मिळालेल्या मतांचा आकडा साडे बारा हजारच्या घरात पोहोचला आहे. नोटाला 12776 मतं तर अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना 1506 मतं मिळाली आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती.
रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. या निवडणुकीत दिवंगत लटके यांच्या पत्नी आणि ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते. राज ठाकरे आणि शरद पवारांच्या विनंतीनंतर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेतली होती आणि त्यानंतर या निवडणुकीची चर्चा थंडावली. एकतर्फी निवडणूक झाल्याने ३ नोव्हेंबरला केवळ 31.74 टक्के मतदान झालं. ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित मानला जात असतानाच या निवडणुकीत मतदानाच्या आधी पडद्यामागून ‘नोटा’ ला मत टाका असा जोरदार प्रचार झाल्याची चर्चा आहे. दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ पर्यायाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाने मतदानापूर्वी नोटाला मतदान करण्याचे आव्हान विरोधकांकडून केले जात असल्याचा आरोप केला होता.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!