Live
जालना दर्पण

उस्मानपुर कलापथकाच्या वतीने कोरोणावर गावोगावी जनजागृती

परतूर (प्रतिनिधी)-जालना जिल्हा माहिती व संपर्क कार्यालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कोरोना महामारी बाबतीत ग्रामीण भागात जनजागृती व्हावे यासाठी तालुक्यातील मौजे उस्मानपूर येथील श्री तुळजाभवानी लोककला संच पथकाच्या वतीने परतूर तालुक्यातील पांडेपोखरी, सातोना खुर्द, सातोना बुद्रुक, आष्टी, लोणी व परतूर शहरातील विविध प्रभागांमध्ये सुंदर अभिनय करून व कोरोणावर रचलेले लोकगीत गावून लोकांना कोरोना रोगाच्या बाबतीत जागृत करण्यात येत आहे.सरकारी नियम तंतोतंत पाळा । बसेल हो या कोरोनाला आळा ।
कलासंच च्या कलाकारांनी कोरोना विषयी रचलेले जनजागृतीपर गीतानी ग्रामीण लोकांचे लक्ष वेधले आहे, यात
“रोग संसर्गजन्य तूम्ही जाणा तरी । आला कोरोना, नका जावू बाहेरी व “सर्दी, खोकला,तापाची येता कणकण; आरोग्य केंद्रावर्ती घ्यावे हो तपासून. यासह
मोठ मोठी देश गेली यात संपूर्ण, पहा डोळूयांनी ऐका उघडे ठेवूनी कान, सांगतो ध्यानी धरा वेळ ही नाही बरी, आला कोरोना नका जावू बाहेरी. तर दुसरे लोक गीत
सरकारी नियम पाळा, बसल कोरोनाला हो आळा.
ही लोकगीते ग्रामीण भागात गाऊन जनजागृती केली जात आहे.
या कला पथकात कलावंत प्रल्हादराव शंकरराव बिडवे, गंगाधर प्रल्हादराव बिडवे, रंगनाथ प्रल्हादराव बिडवे, नितिन सखाराम कदम, विठ्ठल आसाराम कापसे, सचिन गंगाधर बिडवे, परशूराम मारोतीराव गोरे, मिराबाई बबनराव चिकणे, अलकाताई सूरेशराव कदम, सार्थक रंगनाथ बिडवे आदी परिश्रम घेत आहेत.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!