Live
भारत दर्पण

एका दिवसात 80 लाख पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली: ‘कोविड लसीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना’ अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी कोविड लसींचे 80 लाख पेक्षा जास्त डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आतापर्यंत लस विनामूल्य असताना सोमवारीपासून सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार ही सुविधा 18 वर्षांवरील प्रत्येकासाठी वाढविण्यात आली आहे.

या महिन्याच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की सरकार कोविड लसीकरण केंद्रीकृत खरेदीप्रणालीकडे वळेल आणि सर्व प्रौढांसाठी लस मोफत दिली जाईल. यामध्ये केंद्र सरकार एकूण लसांपैकी 75 टक्के लस घेवून ती राज्यांमध्ये वितरीत करणार आहे. खासगी क्षेत्रातील रुग्णालये उर्वरित 25 टक्के खरेदी करू शकतील आणि प्रती डोस जास्तीत जास्त 150 रुपये घेतील.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!